आदित्य अतुल माने (मोडी लिपी अभ्यासक )
- पत्ता :- १०४७ ए वार्ड , फिरंगाई मंदिर नजीक , शिवाजी पेठ , कोल्हापूर .
- फोन नंबर :- ७७०९२६२४८१ , ९५१८९१५८०७.
- शिक्षण :- १ ) बी . ए . इतिहास.
२ ) एम. ए. इतिहास.
३ ) पुराभिलेखागार कोल्हापूर मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग उत्तीर्ण. (२०१६ )
- ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी छोटेसे योगदान.
१ ) स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त १९ जानेवारी २०२० रोजी मोडीलिपी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
२ ) ३० जानेवारी २०२० रोजी " प्रशिक्षण मोडीलिपीचे " या अंकलिपीचे प्रकाशन सन्माननीय. कुलुगुरु
शिवाजी विद्यापीठ श्री. देवानंद शिंदे सर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाप्रसंगी शस्त्रास्त्र संग्राहक श्री. गिरीश जाधव सर , भवानी चित्र संग्रहालय औन्ध व टाऊन हॉल कोल्हापूरचे उदय सुर्वे सर , न्यू. कॉलेजचे इतिहास विभाग प्रमुख श्री. बी. पी. चव्हाण सर , प्राध्यापिका गगराणी मॅडम इ. उपस्तिथ होते.
३ ) शिवराज्याभिषेक दिन ६ जून २०२० निमित्त whatsapp द्वारे घरबसल्या मोडीलिपी शिकण्यासाठी
ऑनलाईन प्राथामिक मोडीलिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण वर्गाची
दखल हि एबीपी माझा , इ टीव्ही मराठी या न्यूज चॅनेलनी त्याचबरोबर स्थैर्य , स्वराज्य लाईव्ह , दैनिक
महानकार्य , दैनिक वार्ताशक्ती , दैनिक कीर्तिवंत , दैनिक स्वतंत्र प्रगती , दैनिक वार्ता , दैनिक जनप्रवास ,
मीडिया कंट्रोल , dailyhunt , दैनिक लोकमत अशा प्रसिद्ध वृत्तपत्रांनी सुद्धा घेतकी.
४ ) वीर शिवाकाशीद पुण्यदिना निमित्त १२ जुलै २०२० रोजी ऑनलाईन सुंदर मोडीलिपी हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन whatsapp माध्यमातून करण्यात आले होते. सदर स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ५८ विद्यार्थी सहभागी झाले होते.
५ ) २८ जुलै २०२० रोजी झूम मिटिंग व युट्युब माध्यमातून " संशोधनाची दिशा मोडीलिपी " या विषयावर श्री. गणेशकुमार खोडके ( अभिलेख अधिकारी , कोल्हापूर पुरालेखागार ) यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. सदर उपक्रमासाठी २४० इतिहास अभ्यासकांनी सहभाग नोंदवला होता.
६ ) राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त १० डिसेबर ते १० जानेवारी २०२१ या कालावधीत ऑनलाईन प्राथमिक मोडीलिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
७ ) स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त whatsapp माध्यमातून मोडीलिपी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा व मोडीलिपी शीघ्र लिप्यांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ६० मोडीलिपी अभ्यासकांनी सहभाग नोंदवला होता.







Comments
Post a Comment